User login

नमस्कार!,
गम्मत वाटली असेल ना तुम्हाला साईट चे नाव वाचून. बरोबरच आहे कारण आपल्या भारतीय संस्कृती मधे लग्नापूर्वी कु. लिहीतात कुमारीका म्हणून, सौ. लिहीतात सौभ्यागवती म्हणून मग हा क. ची काय भानगड आहे?
सांगते क म्हणजे कवयित्री. मी स्वत:हून स्वत:ला कवयित्री म्हणवून घेणार नाही. हे नाव मला माझ्या भाऊजींनी दिले आहे.ते मला कायम क. श्वेताच म्हणतात. म्हणूनच माझ्या या संकेत स्थळाचे नाव मी क. श्वेता ठेवायचे ठरवले.

एकदा देव मला प्रसन्न झाला
म्हणे,'कुठला वर हवा बेटा तुला?'

मला देवाने नमागताच सारे काही दिलेले
काय मागावे हे मज पामराला न उमगलेले

आमची पूजा आहेच मुळी शुरवीर
तयारच असते तीची शब्दांची तलवार

कुठल्याही प्रश्नाचे असते तीज जवळ हजर
प्रश्नांच्याही आधी, देते ती अगदी अचुक उत्तर

Syndicate content