चिऊ ताई चा डायनिंग टेबल

चिऊ ताई चा डायनिंग टेबल

चिऊ ताईला एकदा वाटलं
घ्यावं एक डायनिंग टेबल

पिल्लांना खाऊ घालावं
अन लगेच बाजारात जावं

छान सुंदर डायनिंग टेबल
घराची शोभा पण वाढवेल

चिऊताई होती विचारात गढलेली
मनाने तर कधीच दुकाणात पोहचलेली

कुठला घ्यावा बरे? सनमायकाचा
की घ्यावा छान काचेचा? की मेटलचा?

चिऊताईने पिल्लांना पटापटा भरवले
डायनिंग टेबल साठी चिमनोबांना पटवले

दोघे जेव्हा फर्निचरच्या दुकाणात पोहचले
सारे फर्निचर पाहून तर चिऊ ताईचे डोळे दिपले

एक छानसा डायनिंग टेबल चिऊ ताईने निवडला
चिमनोबांना तर 'होम मिनिस्टर' ला दुजोरा द्यावाच लागला

अशा प्रकारे डायनिंग टेबल चिऊताईच्या घरी आले
आणि जंगलामधे चिऊ ताईचे शायनिंग भलतेच वाढले