कविता ……

कविता ……

सुचल्या पाहिजेत, गाण मनाचं घेउन

नाचल्या पाहिजेत |

शब्दां शब्दांतून चांदण्या सांडल्या पाहिजेत

कविता ……

को या कागदावर रंग गुलाबी घेउन रंगल्या पाहिजेत

प या स्वप्नांच्या राज्यात उतरल्या पाहिजेत

कविता ……

फुले घेउन फुलल्या पाहिजेत

झुले घेउन वा यावर झुलल्या पाहिजेत

कविता ……

 

पऱ्या होउन खुलल्या पाहिजेत

फुल पाखरू होउन बागडल्या पाहिजेत

फुल पाखरू होउन हसल्या पाहिजेत

कविता ……

 

मेघ होउन बरसल्या पाहिजेत

पिसारे होउन नाचल्या पाहिजेत

कविता ……

 

आठवणींनी शहारल्या पाहिजेत

गंध घेउनी बहरल्या पाहिजेत

कविता ……

तुझ्या माझ्या भेटीची साक्ष ठरल्या पाहिजेत

कविता ……