नीलम परी

नीलम परी

आमच्या कडे आहे एक नीलम परी

डिजाईन्स बनवते ती भारीहून भारी

 

 जरी शांत आहे परी त्याहुनी प्रेमळ

 दिसायलाही आहे ती फारच सोज्वळ

 

कामात ती खूप मग्न असते 

इतर मग कुठेच लक्ष नसते

 

 कायम करते मन लाऊन काम

 त्यातच सामवले आहेत चारी धाम

 

आधी पटले पाहिजे तीला

मगच दाखवते ती इतरांना

 

 आवडते ती खूप खूप मला

 ती सदा खुष रहावी ही प्रार्थना देवाला