व्यक्ती चित्रण

अनिरूद्ध

एकदा देव मला प्रसन्न झाला

 म्हणे,'कुठला वर हवा बेटा तुला?'

  

    मला देवाने नमागताच सारे काही दिलेले

    काय मागावे हे मज पामराला न उमगलेले

 

नुकतेच होते हरवले मातृछत्र

 उणीव मनात होती तीच मात्र

    

    'मज माझी हवी आई' नकळत साश्रु बोलले

     हे ऐकूणी प्रेमळ देवाच्याही डोळ्या अश्रु दाटले

 

 'बेटा हे नको मागू, दुसरे काही सांग

  मनातली कुठलीही गोष्ट मला तू माग'

      

      खूप विचार करुनही मज उमगत नव्हते

      काय मागु काय मागु हा विचार करत होते

 

शुरवीर पूजा

आमची पूजा आहेच मुळी शुरवीर

तयारच असते तीची शब्दांची तलवार 

 

 कुठल्याही प्रश्नाचे असते तीज जवळ हजर

 प्रश्नांच्याही आधी, देते ती अगदी अचुक उत्तर

 

कणखर बाणा, कायम असते कष्टाची तयारी

तीच्या कडून मन घेते कामकरण्यासाठी उभारी

 

 वेड लावतो तीचा कायम हसरा

 बालीश अन गोंडस गोरा गोरा चेहरा

 

पूजा आहे खूप खूप शहाणी आणि गुणी 

'आदि वेंचर्स'ची ती आहे झाशीची राणी

नीलम परी

आमच्या कडे आहे एक नीलम परी

डिजाईन्स बनवते ती भारीहून भारी

 

 जरी शांत आहे परी त्याहुनी प्रेमळ

 दिसायलाही आहे ती फारच सोज्वळ

 

कामात ती खूप मग्न असते 

इतर मग कुठेच लक्ष नसते

 

 कायम करते मन लाऊन काम

 त्यातच सामवले आहेत चारी धाम

 

आधी पटले पाहिजे तीला

मगच दाखवते ती इतरांना

 

 आवडते ती खूप खूप मला

 ती सदा खुष रहावी ही प्रार्थना देवाला

आमची पल्लवी

खूप हुशार आहे आमची पल्लवी

प्रेमळ, गुणी आहे तेवढीच लाघवी

 

 इन्वेंशन करायला पल्लवीला आवडते फार

 कुठल्याच फंक्शॅनिलिटी समोर मानत नाही हार

 

मला तिची एकाग्रता फार आवडते

तिने केलेले काम क्लायंटसनाही भावते

 

आम्ही पल्लवीला आदिवेंचर्सचा आधारस्तंभ म्हणतो

तिची कृती, तिचा आत्मविश्वास आमचे म्हणने सार्थ करतो

 

सर्वांना मदत करण्यास कायम तयार असते

अशी आमची पल्लवी सगळ्यांनाच खूप खूप आवडते