कवितेवरील कविता

कविता ……

सुचल्या पाहिजेत, गाण मनाचं घेउन

नाचल्या पाहिजेत |

शब्दां शब्दांतून चांदण्या सांडल्या पाहिजेत

कविता ……

को या कागदावर रंग गुलाबी घेउन रंगल्या पाहिजेत

प या स्वप्नांच्या राज्यात उतरल्या पाहिजेत

कविता ……

फुले घेउन फुलल्या पाहिजेत

झुले घेउन वा यावर झुलल्या पाहिजेत

कविता ……

 

पऱ्या होउन खुलल्या पाहिजेत

फुल पाखरू होउन बागडल्या पाहिजेत

फुल पाखरू होउन हसल्या पाहिजेत

कविता ……

 

मेघ होउन बरसल्या पाहिजेत

पिसारे होउन नाचल्या पाहिजेत

कविता ……

 

कविता म्हणजे

काय लिहावे कसे लिहावे 

यांच्या कशाला विचारात पडावे

जे आहे मनात ते 

सगळे कागदावर उतरवावे

 

कविता म्हणजे मनातली भाषा

कविता म्हणजे मनातली आशा

जे बोलता लिहीता येत नाही 

अशी सुखद, शांत निशा