बडबडगीते

चिऊ ताईच्या पिला ...

चिऊ ताईच्या पिला, आकाशातील सगळे मार्ग कसे सापडतात तूला?

आई सवे मी जरी गेलो मी तरी रस्त्यांचा न जागेचा गोंधळच उडतो जरा

आई असते दिमतीला? की पोलीस मामा का असती तव मदतीला? 

की माझ्यासारखी पोलीस मामांची भीतीच वाटते तुला?

चिऊ ताईच्या मुला, सारखा खेळत असतो म्हणून आई रागावते का तुला?

अच्छा तर मी पाळतो, खूप मी बडबड करतो बघ आईने हाकच दिली मला...

चिऊ ताईच्या पिला, आकाशातील सगळे मार्ग कसे सापडतात तूला? 

अवनीश सांगतो ...

काम करतो मी पटापटा

घरे आवरतो मी चटाचटा

 

रांगतो बघा झपझप

वस्तू उचलतो सपसप

 

आई/बाबांची किती मदत करतो

दिवसभर मी कामातच असतो

 

झोपणे मला आवडत नाही

उद्योगातच गुंतलेला मी सदाही

 

इकडे तिकडे बिलकुल नाही गमत

एवढे फिरुनही कधीच नाही थकत

 

बाबा म्हणतात जरा खेळणी खेळ

कसे सांगू त्यांना मला नसतो थोडापण वेळ

 

किती दिवस रहायच अस छोट?

मला व्हायच आहे खूप खूप मोठ

 

आई बाबांना ठेवेन सदैव खूश

सार्थ करेन माझे नाव 'अवनीश'